Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Big update from Lok Sabha regarding the 8th Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग ( 8th pay commission ) संदर्भात मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .
लोकसभेत प्रश्न उपस्थित : नविन वेतन आयोग संदर्भात लोकसभेत खासदार आनंद भदोरिया व टी.आर बाळू यांनी प्रश्न उपस्थित केला होता . सदर प्रश्नांस केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे .
प्रश्न काय होता ? : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी दिलेली आहे . परंतु सदर आठवा वेतन आयोग समितीसाठी अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता .
वित्त मंत्री पंकज चौधरी यांचे उत्तर : वरील प्रश्नाला अनुसरुन केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देत म्हणाले कि , आठवा वेतन आयोग हा तेव्हांच लागु केला जाईल , ज्यावेळी वेतन आयोग मार्फत शिफारसी करण्यात येईल .
यामुळे आता आठवा वेतन आयोग लांबणीवर जाणार हे निश्चित आहे . कारण आठवा वेतन आयोगाची घोषणा होवून 06 महिने झाले तरीही अध्यक्ष , सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही .
यामुळे खासदारांनी नविन वेतन आयोगाच्या अध्यक्ष , सदस्य निवडी तसेच टर्म्स ऑफ रेफरन्स विषयक माहिती मागविण्यात आलेली आहे .
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )
- अर्थसंकल्प 2026 : नवीन कर प्रणाली अशी असणार ? जाणून घ्या सविस्तर !
- थकित वेतन देयके अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक दि.21.01.2026
- 12 वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे संदर्भात परिपत्रक दि.22.01.2026