Marathisanhita प्राची पवार प्रतिनिधी [ An important Government Resolution regarding state officers/employees, issued by the Finance Department on June 17, 2026. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17 जुन 2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , ज्या शासकीय कर्मचाऱ्यांने दिनांक 01.11.2005 पुर्वी शासन सेवेत निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असताना , त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेच्या पदावरील नियुक्तीसाठी अर्ज केला असेल , व त्यास दिनांक 01.11.2005 रोजी अथवा ..
त्यानंतर नविन पदावर नियुक्त करण्यात आले असेल ,तर अशा कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याची प्रकरणे वित्त विभागाच्या दि.12.01.2007 शासन परिपत्रकानुसार नमूद अटी व शर्तीनुसार तपासण्यात येतात ..
यानुसार दि.01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच अथवा अन्य विभागातील / कार्यालयांमध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास , अशी प्रकरणे शासन परिपत्रकांमध्ये नमुद अटी / शर्ती तपासण्यात येतात .
कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याबाबतची प्रकरणे तपासताना खाली नमुद कागदपत्रे तपासणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रथम नियुक्तीचे आदेश , परिविक्षाधीन कालावधी पुर्ण केल्याबाबतचे आदेश , नवीन पदासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत/ कार्यालयाने नविन पदाकरीता अर्ज सादर केलेल्या परवानगीची प्रत ..
पहिल्या पदावरुन कार्यमुक्त झाल्याचे / तांत्रितक राजिनामा दिल्याचे आदेश , नविन पदावरील नियुक्तीचे आदेश …
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा