राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंतिम वेतन प्रणापत्राच्या नमुन्यात सुधारणा ; GR निर्गमित दि.25.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Amendment in the form of final pay slip for state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करणे बाबत राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 25.07.2025 रोजी महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या सुधारित नमुन्यांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांला देण्यात आलेली वेतनवाढ , देय असणारी पुढील वेतनवाढ ना विभागीय चौकशी व ना मागणी प्रमाणपत्रांच्या अंतर्गत आवश्यक असणारी माहिती , वसुली असल्यास वसूलीचा तक्ता ..

शासकीय कामासाठी घेतलेली परंतु समायोजित न केलेली अग्रिमाची रक्कम तसेच प्रदानाच्या तपशिलांमध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची अधिकची माहिती या बाबी समाविष्ट असणार आहेत .

तसेच अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यांमध्ये करण्यात आलेल्या सदर सुधारणेच्या अनुषंगाने सेवार्थ प्रणालीमध्ये समुचित विकसन करुन घेण्यास संचालक , लेखा व कोषागारे , महाराष्ट्र यांना प्राधिकृत करण्यात येत आहेत . त्याप्रमाणे सर्व संबंधित वापरकर्त्यांसाठ समुचित मार्गदर्शक पुस्तिका तयार करुन ते सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही देखिल संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र यांनी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : ऑगस्ट महिन्यात या तारखेला सलग 03 दिवस शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये व बँकांना असणार सुट्टी .

सविस्तर शासन निर्णय व निर्णयातील सुधारित अंतिम वेतन प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment