Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ A major update for ration card holders ] : शिधापत्रिका धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , यांमध्ये ई-केवायसी करण्याचे कारण , ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम , तसेच अंतिम मुदत या या बाब यामध्ये नमुद करण्यात आलेली आहेत .
ई-केवायसी का करावी ? : रेशनकार्ड धारकांना लाभ निरंतर चालु ठेवण्यासाठी सदर ई- केवासयी करणे अनिवार्य असणार आहे . सदर अन्नधान्य फक्त पात्र असणाऱ्या कुटुंबानाच मिळणार असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी ई – केवायसी करावी लागेल .
ई – केवायसी न केल्यास होणारे परिणाम : ई – केवायसी न केल्यास लाभार्थी धारकांना रेशन मिळणार नाही , तसेच त्यांचे रेशनकार्ड हे निष्क्रिय होईल .
ई – केवायसी कशी करता येईल ? : ई – केवायसी लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड सादर करणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये बायोमेट्रिक करणे आवश्यक असणार आहे . तसेच आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक असेल अशाच प्रकरणी ई- केवायसी पुर्ण करता येणार आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांवर सध्याचे प्रत्यारोप व दुसरी बाजू ; जाणून घ्या महत्वपूर्ण लेख !
ई – केवायसी करण्याची अंतिम मुदत ही 31.07.2025 ही अंतिम मुदत असणार असल्याची माहिती राज्याचे मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे .
सदर ई- केवायसी कशी कराल ? : ई-केवायसी करण्यासाठी rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अथवा आपल्या जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी भेट देवून आधारकार्ड लिंक करु शकता .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025