Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular issued on 19.11.2025 regarding payment of salary for the months of October and November 2025. ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2025 चे वेतन देयके अदा करणेबाबत दिनांक 19.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रक हे आयुक्त बृहन्मुंबई पालिका तसेच सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या प्रति मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाने दिनांक 06.08.2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार , क्षेत्रिय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीतील उपलब्ध असणारी सर्व पदे ही शासन निर्णयानुसार अचुक असल्याची खात्री करुन त्याबाबतची प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाने ..
माहे सप्टेंबर 2025 च्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते ,परंतु तांत्रिक अडचणी येत असल्याने दिनांक 31.10.2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती .
परंतु सदर पदांचा ताळमेळ करण्यास विलंब लागत असल्याने , सदर प्रमाणपत्र सादर करण्यास माहे डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे . यामुळे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2025 ची वेतन देयके प्रमाणपत्राशिवाय सादर करता येणार आहेत .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा