महाराष्ट्रातील आमदारांचे निवृत्तीवेतनात ( Pension ) मध्ये आत्तापर्यंत 18 वेळा वाढ ; तर कर्मचाऱ्यांना का नाही ?

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Pension of MLAs in Maharashtra has been increased 18 times so far ] : राज्यातील आमदारांच्या निवृत्तीवेतनांध्ये आत्तापर्यंत तब्बल 18 वेळा वाढ झालेली आहे , तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये सुधारणा करण्यास विलंब का होतोय असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येतोय .

एक टर्म महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर त्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे निवृत्तीवेतन अधिनियम 1976 मधील वेळोवेळी झालेल्या सुधारणांच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन अदा करण्यात येते .

महाराष्ट्र राज्याच्या स्वतंत्र कारभारानंतर आत्तापर्यंत तब्बल 18 वेळा सदर आमदारांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात आलेली आहे . यांमध्ये प्रथम 1977 मध्ये आमदारांच्या पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत , अधिनियम निर्गमित करण्यात आला  . तर अखेरची सुधारणा 2016 मध्ये करण्यात आलेली आहे .

आतापर्यंत आमदारांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आलेले अधिनियम सन पुढीप्रमाणे पाहु शकता .

अ.क्रसनपेन्शन सुधारणा अधिनियम व क्रमांक
01.1977अधिनियम क्र.01
02.1981अधिनियम क्र.29
03.1986अधिनियम क्र.41
04.1989अधिनियम क्र.03
05.1991अधिनियम क्र.05
06.1993अधिनियम क्र.19
07.1994अधिनियम क्र.06
08.1996अधिनियम क्र.22
09.1999अधिनियम क्र.32
10.2000अधिनियम क्र.15
11.2003अधिनियम क्र.25
12.2006अधिनियम क्र.46
13.2007अधिनियम क्र.26
14.2008अधिनियम क्र.24
15.2009अधिनियम क्र.18
16.2011अधिनियम क्र.23
17.2013अधिनियम क्र.24
18.2016अधिनियम क्र.32

वरीलप्रमाणे राज्यातील आमदारांच्या पेन्शन मध्ये तब्बल 18 वेळा वाढ करण्यात आलेली आहे . तर राज्यातील कर्मचाऱ्यांची पेन्शन रद्द करुन शेअर बाजारावर आधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागु करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

सदर NPS योजनांचा राज्य कर्मचाऱ्यांकडून होत असणारा विरोध लक्षात घेता आता राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकीकृत पेन्शन योजना ( UPS ) या पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment