राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ A major important decision by the government regarding state employees ] : राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे .

कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी , याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे . यांमध्ये दिनांक 25.04.2004 पुर्वी राज्य शासन सेवेत रुजु झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातुन पदोन्नती प्राप्त झालेल्या …

कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रथम नियुक्ती दिनांक पासुनच पुढील पदोन्नतीकरीता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलिस प्रशासनांतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखिल होणार आहे .

तसेच 27.05.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागु करण्यात आलेली होती ,परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : मध्य रेल्वे ( महाराष्ट विभाग ) अंतर्गत तब्बल 2412 रिक्त पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

यांमध्ये प्रामुख्याने दिनाक 25.04.2004 पुर्वी अथवा त्याच्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता मध्ये संभ्रमता निर्णाण झालेली होती . तर आता दिनांक 25.04.2004 अथवा त्यापुर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षांने उत्तीर्ण होवून वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नती करीता ..

सेवाज्येष्ठता दिनांक ही 25.04.2004 अशी धरली जाईल , असे स्पष्‍ट करण्यात आले आहेत . तसेच दि.25.04.2004 नंतर रुजु झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्याना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच सेवाज्येष्ठतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे .

Leave a Comment