जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised important circular issued regarding intra-district transfer process 2025 ] : जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबतचे धोरण दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार सुधारित करण्यात आले आहेत . सदर निर्णयातील विशेष संवर्ग शिक्षक भाग – 01 करीता पात्र गणले जाणारे शिक्षक नमुद करण्यात आले आहेत .

त्यानुसार हृदय शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना त्याचबरोबर जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग – 01 म्हणून गणण्यात येणार आहेत . तसेच सदर संवर्गातील शिक्षकांना बदलीकीरता नकार अधिक असल्याने शिक्षकांना केवळ विनंतीवरुनच बदली दिली जाणार आहे .

त्याचबरोबर दिनांक 18.06.2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार शासनाचा केवळ गंभीर आजाराने ग्रस्त शिक्षक तसेच जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त असेल तरच अशा शिक्षकांना बदलीतुन सुट देणे अभिप्रेत आहे . त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे केवळ बायपास सर्जिरी , ओपन हार्ट सर्जरी इनप्लांट सर्जरी इ. गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांनाच बदलीतुन सुट अथवा विनंती बदली देणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 475 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Angioplasty झालेल्या शिक्षकांना विशेष शिक्षक भाग – 01 चा लाभ अनुज्ञेय नाही तथापि जिल्हा परिषद मार्फत Angioplasty झालेल्यांना विशेष शिक्षक भाग – 01 चा लाभ अनुज्ञेय करण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहेत .

Leave a Comment