Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised reservation for Group C and D cadre posts in eight districts namely Dhule, Nashik, Nandurbar, Palghar, Raigad, Yavatmal, Chandrapur and Gadchiroli. ] : राज्यातील धुळे , नाशिक , नंदुरबार , पालघर , रायगड , यवतमाळ , चंद्रपुर व गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये गट क व ड संवर्ग पदभरती करीता सुधारित आरक्षण व बिंदुनामावली विहीत करणेबाबत , सा.प्र.वि मार्फत दिनांक 29.07.2025 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ( एसईबीसी ) वर्गाच्या 10 टक्के आरक्षणासह राज्यातील वरील नमुद आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण विहीत करण्यात आले आहेत .
पदभरती मध्ये गट क व गट ड संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण विहीत करण्यात आलेले आहेत . गट ब व अ संवर्गासाठी सदर तरतुद लागु नाही .
सदरचा शासन निर्णय हा दिनांक 29.07.2025 पासुन अंमलात येणार असून , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सदर शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना / आस्थापनांना निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
सुधारित आरक्षण तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ वेळेवर अदा करणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.01.08.2025
- LIC Policy Scheme : एलआयसीच्या या भन्नाट योजनेमध्ये दररोज 166 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर मिळवा 50 लाख रुपये !
- नविन / आठवा वेतन आयोग बाबत सरकार मार्फत देण्यात आली महत्वपुर्ण माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय निर्गमित दि.31.07.2025
- राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सुधारित GR निर्गमित दि.31.07.2025