“या” प्रमुख 09 मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी ; जाणून घ्या सविस्तर मागण्या ..

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ state employee strike news ] : राज्य कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवण्यात आलेली आहे .

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मार्फत राज्याची माननीय  मुख्यमंत्री यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात आले आहेत . सदर खाली नमूद करण्यात आलेल्या 09 मागण्यावर राज्य सरकारकडून योग्य असा सकारात्मक निर्णय घेतला न गेल्यास , माहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती सदर निवेदनामध्ये संघटना मार्फत देण्यात आली आहे .

याशिवाय सध्या देशांमध्ये सुरू असलेल्या 11 संघटनाने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपला राज्य कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नऊ मागण्या कोणकोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे जाणून घेवूया .

या आहे प्रमुख 09 मागण्या : 01. सरकारने लागू केलेली नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे . 02. त्याचबरोबर शिक्षकांच्या संघमान्यता संदर्भातील दिनांक 15 मार्च 2024 रोजीचा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

03. वर्ग चार (गट ड) कर्मचारी , तसेच वाहन चालक पदभरती वरील बंदी तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे . (04) सेवानिवृत्तीचे वय ( Retirement age) 60 वर्षे करण्याची मागणी आहे . (05) दोन टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह मंजूर करण्याची मागणी . (6) प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी .

7) कंत्राटी / रोजंदारी /अंशकालीन तत्वावर दहा वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी .  (8) राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये सुधारणा करून राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना (New NPS pension scheme ) संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करावी . (9) नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार करण्याची मागणी .

Leave a Comment