वेतनत्रुटी निवारण समितीकडून 337 पदांना न्याय नाही ; कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणीसाठी पुर्नविचाराची मागणी !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 337 posts not fair from Pay Deficit Redressal Committee ] : राज्य सरकारकडून सातवा वेतन आयोगातील त्रुटी दुर करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीकडून 105 पदांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ लागु करण्यात आला आहे .

परंतु यांमध्ये 337 पदांना सुधारित वेतनश्रेणीची मागणी सदर समितीकडून अमान्य करण्यात आलेली आहे . सदर 337 पदांपैकी असे बरेच पदे आहेत कि , ज्यांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आहेत , परंतु अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी करीता समितीपुढे पुरेसे पुरावे सादर न केल्याने सुधारित वेतनश्रेणी अमान्य करण्यात आलेली आहे .

समान पद / समान कामाचा विचार नाही : सदर 337 पदांपैकी असे काही संवर्गातील पदे आहेत . ज्यांमध्ये समान पद / समान काम असून देखिल वेतनश्रेणीत तफावत आहेत , अशा पदांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभाकरीता समितीकडून शिफारस करण्यात आलेली नाही .

कनिष्ठ पदे / कमी असणाऱ्या पदांवर अन्याय : सदर समितीने सुधारित वेतनश्रेणी करीता कर्मचारी संघटना मार्फत सुधारित वेतनश्रेणी करीता लेखी पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते . परंतु यांमध्ये ज्या पदांचे वेतनत्रुटी आहे , अशा पदांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण न करता त्या संवर्गांशी संबंधित असणाऱ्या संघटनास पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते .

यामुळे ज्या संवर्गातील पदांच्या वेतनश्रेणीमध्ये खऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत . अशा पदांना सदर समितीपुढे अयोग्य सादरीकरणामुळे सुधारित वेतनश्रेणीचा विचार करण्यात आलेला नाही .

वर्ग – 04 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती / आश्वासित / एकस्तर वेतनश्रेणी बाबत विचार नाही : सदर समितीने केवळ वेतनत्रुटी निवारण करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारस करण्यात आली आहे . यामुळे वर्ग -4 कर्मचाऱ्यांच्या संबंधातील पदोन्नतीची वेतननिश्चिती , एकस्तर वेतनश्रेणी , आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेणीचा विचार यांमध्ये करण्यात आलेला नाही .

वेतनत्रुटी निवारण साठी पुनर्विचार मागणी : सदर समितीपुढे चुकीच्या सादरीकरण , ज्या संवर्गातील पदांच्या वेतनत्रुटी आहेत , प्रत्यक्ष त्यांनाच सदर समितीपुढे सादरीकरण / आपले म्हणणे मांडणीची मुफा देण्याची मागणी उर्वरित 337 संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे .

Leave a Comment