बदली प्रक्रिया बाबत महत्वपुर्ण अपडेट ; ग्रामविकास विभाग परिपत्रक दि.07.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important update regarding transfer process ] : कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया संदर्भात ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 07 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति निर्गमित करण्यात आला असून , राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती ही बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश यांमध्ये देण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरलेल्या बाबत माहितीमध्ये सुधारणा करणे नव्याने नावे समाविष्ट करणे तसेच नावे वगळणे करणे करीता आलेल्या विनंती व जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या बदलांकरीता सदर बदली पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदे माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे .

याकरीता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , बदली पोर्टल मधील रिक्त पदांची माहिती ही अद्ययावत करण्याचे काम हे पुढील चार दिवसांमध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

सदर चार दिवसात राज्यातील गट शिक्षण अधिकारी यांनी बदली पोर्टलवरील रिक्त शिक्षक पदाची माहिती अद्यावत करायची आहे . व अद्ययावत करण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर माहिती अपडेट करणेकामी पुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याने , संबंधित अधिकाऱ्यांने जबाबदारीने सदर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment