राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली ; जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regulations regarding casual leave for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्य कर्मचाऱ्यांना एका कॅलैंडर वर्षांमध्ये अनुज्ञेय असणाऱ्या रजा ह्या 08 दिवसांच्या असतात , एका वेळी 07 दिवसापेक्षा अधिक दिवस नैमित्तिक रजा घेता येत नाही .सदर रजा ह्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत 08 दिवसांपर्यत वाढविता येते .

सदर रजा ही सुट्टीला जोडून घेता येते , तसेच एकावेळी हा कालावधी एकुण 07 दिवसांपेक्षा अधिक वाढता कामा नये , फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये नैमित्तिक रजा देय असल्यास 08 दिवसांपर्यंत वाढवता येते .

सदर नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे कितीही रविवार व / किंवा सार्वजनिक सुट्या जोडून तसेच नैमित्तिक रजाच्या मध्ये येणारे एक किंवा अधिक सुट्या नैमित्तिक रजांना जोडून घेता येईल . तथापि एका वेळेस नैमित्तिक रजा व सुट्या व सुट्या मिळून होणारा एकुण कालावधी 07 दिवसांपासून अधिक होता कामा नये  , अपवादात्मक परिस्थितीतच केवळ ही मर्यादा 10 दिवसापर्यंत वाढवून देता येते .

Leave a Comment