Marathi sanhita संगीता पवार प्रतिनिधी [ penshioner good news about mahagai bhatta Vadh GR ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे .
ती म्हणजे पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये जानेवारी 2026 पासून वाढ करण्यात आलेली आहे . या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 19.08.2026 रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की , राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांच्या महागाई भत्ता मध्ये दि.01.01.2026 पासून 02% वाढ करण्यात आली आहे .
सदर DA वाढ ही माहे ऑगस्ट महिन्याच्या पेन्शन देयकासोबत मागील जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीतील फरकासह महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णय हा राज्यातील अनुदानित शाळा , कृषी विद्यापीठे , अशासकीय महाविद्यालये यामधील पेन्शन धारकांना लागू असणार आहे .
