Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on 05.08.2026 regarding the temporary increase in the retirement age. ] : सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दि.05.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , रिट पिटीशन मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास अनुसरुन राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दि.31.03.2026 रोजीपासुन 62 वर्षे करण्यात येत आहेत .
जे न्यायिक अधिकारी दि.31.03.2026 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत , त्यांच्या लेखी संमतीनंतर त्यांना वाढीव सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच त्यांच्या वयाची 62 वर्षे पुर्ण होईपर्यंत शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
सदरचा शासन निर्णय हा रिट पिटीशन मधील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत आहे . सदर याचिकेतील अंतिम निर्णयानुसार पुढील आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यात येईल . असे नमुद करण्यात आलेले आहेत.

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR