आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! HRA आणि TA भत्त्यात वाढीची मागणी; लेव्हल-1 कर्मचाऱ्यांना 9 हजार रुपये मिळणार?

Spread the love

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनासोबतच घरभाडे भत्ता म्हणजेच HRA आणि प्रवास भत्ता म्हणजेच TA वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रस्तावानुसार, HRA चे दर शहरांच्या श्रेणीनुसार वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये X श्रेणीतील शहरांसाठी 36 टक्के, Y श्रेणीतील शहरांसाठी 24 टक्के आणि Z श्रेणीतील शहरांसाठी 12 टक्के HRA देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

तसेच लेव्हल-1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 9 हजार रुपये प्रवास भत्ता मिळावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रिस्क आणि हार्डशिप अलाउन्स तसेच ड्रेस अलाउन्समध्ये वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, महागाई भत्ता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास तो मूळ वेतनात विलीन करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

मात्र, या सर्व मागण्या आणि प्रस्ताव असून त्यांना केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नवीन वेतन आणि भत्त्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment