माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Major update regarding the salary for August (payable in September 2026); circular issued on July 31, 2026. ] : माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . या संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दि.31.07.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेला आहे सेवार्थ प्रणालीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत  वित्त विभागाच्या दि.27.03.2026 रोजीच्या परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले होते . तसेच माहे मे 2026 पर्यंत ई-केवायसी पुर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती .

वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि.28.07.2026 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तात्काळ पुर्ण करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार दिलेल्या निर्देशानुसार , अंशत : अनुदानित , खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 या वेतन  देयक अगोदर ई -केवायसी पुर्ण करणे आवाश्यक आहे .

सदर ई-केवायसी पुर्ण न केल्यास , संबंधित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे व याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद् घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment