विना-अनुमती गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत परिपत्रक दि.29.07.2026

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 29.07.2026 regarding action to be taken against officers/employees remaining absent without permission. ] : विना-अनुमती गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत परिपत्रक दि.29.07.2026 रोजी सामान्य प्रशासन विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , कार्यालयाती कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांने सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पुर्व परवानगी शिवाय रजेवर जावू नयेत .

  • कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याने कर्तव्ये कालावधीत व रजा कालावधीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नयेत .
  • सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल असे नमुद करण्यात आले आहेत .
  • तसेच विनाअनुमती अनुपस्थित राहणाऱ्या / विनाअनुमती मुख्यालय सोडून जाणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करुन ती संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
  • तसेच अधिकारी / कर्मचारी वारंवार विना -अनुमती कार्यालयात गैरहजर राहील्यास / विानाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध निलंबन / शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता त्यांची नावे संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
  • तसेच नियुक्ती अधिकाऱ्यांनी अशी नावे प्राप्त झाल्यापासुन अथवा अशा गैरवर्तवणुकीच्या बाबी अन्य प्रकारे त्यांच्या निदर्शनास आल्यापासुन 01 महिन्यांच्या आत कसुरदार अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment