Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major relief for contract employees ] : कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.16.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता अधिसंख्य पदे निर्माण करुन आवश्यक खर्चास मान्यता घेण्याचा प्रस्ताव सादर करणेबाबत आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे .
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता 15010 अधिसंख्य पदे निर्माण करुन खर्चास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय दि.30.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
या निर्णयानुसार तरतुदी विचारात घेवून स्वयंस्पष्ट प्रस्ताव शासनांस एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा