राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वे बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding revised guidelines to be followed for promotion of state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वे बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.01.08.2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आस्थापना मंडळ / विभागीय पदोन्नती समिती गठीत करणे , पदोन्नतीसाठी विचारात घ्यावयाची पात्रता / निकष तसेच इतर अटी / शर्ती संदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वे संदर्भात सदर निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

बिगर मंत्रालयीन संवर्ग : पदाचा संवर्ग व विभागीय पदोन्नती समितीचे अध्यक्ष कोण असतील , या संदर्भातील सविस्तर रचना पुढीलप्रमाणे पाहु शकता .

तदर्थ निवडसुची : सरळसेवेच्या कोट्यातील पदे आयोग / निवड समितीने पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांच्याच नियुक्तीने भरणे बंधनकारक असेल , तर प्रशासनांची तातडीची गरज म्हणून प्रसंगानुरुप , सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांकरीता आयोग अथवा निवड समिती यांच्याकडे मागणीपत्र पाठविल्यानंतरच मागणीपत्रातील पदसंख्येच्या मर्यादेत अथवा प्रतिनियुक्तीवर 01 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरीता गेल्यामुळे रिक्त असणाऱ्या पदांकरीता तयार करण्यात आलेल्या निवडसुचीस तदर्थ निवडसुची असे संबोधण्याचे निर्देश आहेत .

तात्पुरती पदोन्नती : नियमित निवडसुचीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना न्यायप्रविष्ठ प्रकरण / तात्पुरती ज्येष्ठतासुची अथवा अन्य कारणांच्या अधिन राहून ज्यावेळी पदोन्नती देण्यात येते त्यावेळी अशा पदोन्नतीस तात्पुरती पदोननती असे संबोधण्याचे निर्देश आहेत .

पदोन्नती करीता खालील निकषांच्या आधारे पात्रता तपासण्याचे निर्देश आहेत .

  1. मागील 05 वर्षांचे गोपनिय अहवाल
  2. सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , अनुभव
  3. तांत्रिक परीक्षा
  4. विभागीय परीक्षा
  5. अनिवार्य परीक्षा ( संगणक अर्हता , मराठी / हिंदी भाषा परीक्षा )
  6. परिविक्षाधिन कालावधी पुर्ण केलेबाबत माहिती
  7. स्थायित्व लाभ प्रमाणपत्र
  8. जातवैधता प्रमाणपत्र
  9. मत्ता व दायित्व विवरणपत्र
  10. वयाच्या 50/55 वर्षाच्या सेवेनंतर ठेवण्याबाबतचे पुनर्विलोकन
  11. विभागीय चौकशी / न्यायालयीन कार्यवाहीबाबतची माहिती
  12. संशयास्पद सचोटी बाबतची माहिती
  13. अनिवार्य प्रशिक्षण

या संदर्भाती सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment