दि.22 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Four major cabinet decisions were taken during the Cabinet meeting held on April 22. ] : दि.22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 04 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .

01.बायोगॅस प्रकल्प : राज्याचे कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर करण्यात आले आहे . यानुसार या वर्षाकरीता 500 कोटींची तरतुद तर घनकचऱ्यांचे व्यवस्थापन हरित गृह वायु उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे .

02.भरती प्रक्रिया मध्ये अतिरिक्त गुण : राज्यांमधील 07 आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षक यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मुळ वेतन दिले जाणार आहे , सदर पदावरील शिक्षकांना विभागाच्या पदभरतीमध्ये अतिरिक्त गुण दिले जाणार आहे .

03.महसुल विभाग : सातारा जिल्हा मौजे नागेवाडी येथे IT पार्ककरीता जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यामुळे रोजगार निर्मितीस संधी मिळणार आहे .

04.जमीन धारणा मर्यादा : राज्यात कमाल जमीन मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग – 01 मध्ये रुपांतरणांच्या अधिमुल्याची पुनर्रचना बाबत अधिसुचना काढण्यास मान्यता देण्यात आली आहे .

Leave a Comment