Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued on 24.02.2026 for all government employees in the state ] : राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकरीता दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानी पुरविण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांसाठीचे सेवाशुल्काचे दर खाली नमुद करण्यात आलेल्या तक्त्याप्रमाणे वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यानुसार दिनांक 01.02.2023 पासुन राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचनानुसार निवासस्थानांसाठी विद्यमान सेवाशुल्काच्या दुप्पट इतके सेवाशुल्क वसुल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
| अ.क्र | कर्मचाऱ्यांस अनुज्ञेय वेतनस्तर | सेवाशुल्क रक्कम |
| 01. | एस-01 ते 05 | 220 |
| 02. | एस- 06 ते 10 | 270 |
| 03. | एस – 11 ते 13 | 370 |
| 04. | एस – 14 ते 20 | 490 |
| 05. | एस – 21 ते 25 | 650 |
| 06. | एस – 26 व त्यापेक्षा अधिक | 930 |
वरील प्रमाणे सुधारित सेवाशुल्क दिनांक 01.02.2023 पासुनच्या कालावधीची अतिरिक्त वसुली मासिक वेतन देयकामधून 3 हप्त्यात वसूल करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत .


- दि.21.07.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- दि.21 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय .
- पटसंख्या व कार्यरत शिक्षक यानुसार तात्पुरती व्यवस्था करणेबाबत परिपत्रक ..दि.06.07.2026
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.16.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वपुर्ण : SBI मधुन पेन्शन घेत असाल तर CPP पेन्शन पॅकेजचे फायदे जाणून घ्या व लाभ घ्या !