Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding TET mandatory issued on 01.01.2026 ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 01.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
मा .सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रण खालील स्वयंसेवी संस्थामार्फत संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागु होण्यापुर्वी नियुक्त करण्यात आलेल्या व सेवानिवृत्तीकरीता 05 वर्षे पेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या शिक्षकांच्या बाबत ..
त्यांना सेवेत राहण्यासाठी 02 वर्षांच्या आत ( दिनांक 01.09.2027 पुर्वी ) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे . तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर राज्यामधील आदिवासी विकास विभाग अंतर्गत नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी ( इयत्ता 01 ली ते 8 वी ) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग वेतनश्रेणी तक्ते.
तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे कंत्राटी स्वरुपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच अशाप्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनांकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसल्याचे , तसेच त्यांच्या सेवा आवश्यकता नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून …
सत्रसमाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरुपात भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येवू नये असे नमुद करण्यात आले आहेत .

- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !