Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ 06 major/important Government Decisions (GR) issued on 10.03.2026 regarding State Officers/Employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10 मार्च 2026 रोजी 06 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जुनी पेन्शन योजना : दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन लागु करणेबाबत जलसंपदा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
02.अस्थायी पदांना मुदतवाढ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील 23 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे .
03.महाराष्ट्र विनियोजना अधिनियम : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 चे अनुदान वितरण करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 10.03.2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
04.पदोन्नती / बदली : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने / बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत महसुल व वन विभागाच्या दिनांक 10.03.2026 रोजीच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
05.अस्थायी पदे पुढे चालु ठेवणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग : आरोग्य सेवा आयुक्तालय , मुंबई यांच्या अधिपत्याखालील 41 अस्थायी पदे पुढे चालु ठेवणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 10.03.2026 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे .
06.सामान्य प्रशासन विभाग : सामान्य प्रशासन विभाग खुद्द व विभाग अंतर्गत अन्य चार कार्यालयांच्या आस्थापनेवरील 301 अस्थायी पदे दिनांक 01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत पुढे चालु ठेवणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.10.03.2026 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील 06 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026