Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Unemployment rate at its highest in the state ] : राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर गेल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे , राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या शिपाई पदाच्या पदभरतीसाठी चक्क डॉक्टर , इंजिनीयर , एमबीए , फार्मासिस्ट अशा उमेदवारांनी अर्ज केले आहे .
राज्य सरकारच्या मुद्रांक विभागमार्फत “शिपाई” पदाकरिता भरती प्रक्रिया राबवली जात आहे “या” पदाकरिता तब्बल 120,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून , जागा केवळ 284 इतक्या आहेत .
आणि विशेष म्हणजे यामध्ये राज्यातील उच्चशिक्षित उमेदवार फार्मासिस्ट , कला वाणिज्य विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार त्याचबरोबर नुकतेच उत्तीर्ण झालेले डॉक्टर यांनी देखील शिपाई पदासाठी अर्ज दाखल केले आहेत .
यावरून राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते . तर ज्या क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरी हवी आहे , त्या फिल्डमध्ये किमान वेतन मिळत नसल्याने , सरकारी नोकरीसाठी उमेदवारांची प्रथम पसंती दिसून येते आहे .
खाजगी क्षेत्रात नोकरीची हमी नाही : एकदा सरकारी नोकरी लागल्यास निवृत्तीपर्यंत नोकरीची हमी मिळते , परंतु खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीची हमी नसल्याने , उमेदवार सरकारी नोकरीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत . याशिवाय खाजगी क्षेत्रामध्ये किमान वेतन देखील मिळत नाहीत .