Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ These big changes in ration card rules from April ] : रेशनकार्ड नियमांमध्ये दिनांक 01.04.2026 पासुन मोठे बदल करण्यात येणार आहेत . यांमध्ये काही सुधारित निकष / नियमावली जारी केली जाणार आहे .
या सुधारित नियमावली मुळे बरेच रेशनधारक लाभार्थी यांमधून वगळले जाणार आहेत . सदरची सुधारित नियमावली ही दिनांक 01.04.2026 म्हणजेच नविन वर्षांपासुन लागु केली जाणार आहे .
नियमावली : 1) ई-केवायसी आवश्यक : यापुढे स्वस्त धान्याचा लाभ घेण्याकरीता ई-केवायसी पुर्ण करणे अनिवार्य असणार आहे . अन्यथा रेशन बंद होवू शकेल .ई-केवायसी पुर्ण करण्यासाठी जवळच्या रेशन दुकानांमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
2)उत्पन्न मर्यादा : शहरी भागांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपये तर ग्रामीण भागांमध्ये 2 लाख रुपये पेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असेल असे कुटुंब अपात्र ठरणार आहेत .
3) स्थावर / जंगम संपत्ती : जर कुटुंबाकडे फ्लॅट / प्लॉट अथवा पक्के घर 100 चौ.मी पेक्षा अधिक आकार असेल , अशा वेळी सदर कुटुंब अपात्र ठरणार आहे .
4) आयकर भरणा : जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरणा केला असेल , अशा वेळी सदर कुटुंब हे रेशन कार्ड लाभापासुन वंचित ठरणार आहे .
5) लक्झरी वस्तु असणारे कुटुंब : ज्या कुटुंबाकडे एसी , जनरेटर अशा लक्झरी वस्तु असतील असे कुटुंब देखिल रेशन कार्ड सुविधा लाभांपासुन वंचित ठरणार आहेत .
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ ; परिपत्रक निर्गमित दि.05.03.2026
- रेशन कार्ड नियमांमध्ये दि.01 एप्रिल पासुन हे मोठे बदल ; जाणून घ्या सुधारित निकष / नियमावली ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.10.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 06 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच निवृत्तीवेतन व भत्ते करीता निधी वितरण ; GR निर्गमित !
- शासकीय महिला अधिकारी / कर्मचारी कार्यालयात लवकर आल्यास , लवकर कार्यालय सोडण्याची मुभा ; GR निर्गमित दि.10.03.2026