Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ These 3 types of deductions will be made from the February salary of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातुन दरवर्षी खाली नमुद 03 प्रकारच्या कपाती केल्या जातात , नेमक्या कोणत्या कपाती आहेत ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपाती : दरवर्षी राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातून वार्षिक वर्गणी कपात केली जाते . सदर योजना अंतर्गत दिनांक 24.01.2023 रोजीच्या निर्णयानुसार सुधारित वार्षकि वर्गणी सुधारित करण्यात आलेली आहे . संवर्ग निहाय वार्षिक वर्गणी भिन्न आहे .
| संवर्ग | विमा रक्कम | वार्षिक वर्गणी (रुपये मध्ये GST सह) |
| गट अ | 25 लाख रुपये | 750+135=885/- |
| गट ब | 20 लाख रुपये | 600+108=708/- |
| गट क व ड | 15 लाख रुपये | 450+81=531/- |
02.व्यवसाय कर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महीन्यांच्या वेतनातुन व्यवसाय करची कपात ही 200/- रुपये असते , परंतु दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातून व्यवसाय करची 300/- रुपये रक्कम कपात होते .
03.आयकर रक्कम : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अदा करताना , आयकरचे विवरण सादर करणे आवश्यक असते . व आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित आयकर रक्कमेचा भरणा करावा लागेल . अन्यथा फेब्रुवारी महिन्यांचा पगार होत नाही .
- महिला कर्मचाऱ्यांसाठी ( सरकारी / कंत्राटी / करार ) सुधारित करण्यात आलेले काही कायदे !
- थकीत महागाई भत्ता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला आदेश ; 18 महिने डी.ए साठी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातुन होणार ,या 03 प्रकारच्या कपाती ; जाणून घ्या सविस्तर .
- सन 2026 मधील सार्वजनिक सुट्या अधिकृत्त अधिसुचना निर्गमित दि.05.12.2025 ; जाणुन घ्या सविस्तर यादी !
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या !