Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ The revised structure and revised pay scale of these employees in the state have been implemented. ] : राज्य शासन सेवेतील राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध व सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 04.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार राजभवन कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या आकृतीबंधातील खाली नमुद करण्यात आलेल्या पदांची सुधारित वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेली आहे .
| अ.क्र | पदनाम | सुधारित वेतनश्रेणी |
| 01. | खाद्यपेय सहायक | एस-9 , 26400-83600 |
| 02. | गृहपाल | एस-9 , 26400-83600 |
| 03. | सहायक उद्यान पर्यवेक्षक | एस-9 , 26400-83600 |
| 04. | गट ड ( सहायक ) | एस-5 , 18000-56900 |
तसेच गट ड संवर्गातील मुख्य बटलर या पदनाम ऐवजी प्रमुख बटलर असे पदनामात बदल करण्यात सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !