दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.12.08.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ A very important government decision has been issued regarding the permissible increase in salary and dearness allowance at one and a half times the rate. ] : दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबत , राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 12.08.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 13.01.2023 नुसार आदिवासी / नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमांनुसार एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुज्ञेय करण्यात येतात , गृह विभागाच्या दिनांक 27.06.2025 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील संपुर्ण गडचिरोली जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया , सालेकसा , देवरी व अर्जनी मोरगांव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत .

तर सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 13.01.2023 रोजीच्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक 27.06.2025 पासुन पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

तसेच आदिवासी बहुल क्षेत्राकरीता अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अबाधित राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment