देशातील 44 लाख  सरकारी कर्मचारी व 68 लाख पेन्शन धारकांसाठी नविन वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी !

Spread the love

Marathisanihta चंदना पवार प्रतिनिधी [ The big news regarding the new Pay Commission for the country’s 44 lakh government employees and 68 lakh pensioners. ] : नविन वेतन आयोग ( आठवा ) बाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .

केंद्र सरकारने नविन वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर सध्यास्थिती याबाबत प्रारंभिक कामे सुरु झाले आहे . नविन वेतन आयोगाच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून देशातील भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आलेली आहे .

नविन वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये दिनांक 01.01.2026 पासुन लाक्षणिक वाढ लागु केली जाणार आहे . नविन वेतन आयोग लागु होण्यास विलंब होईल , परंतु प्रत्यक्ष लाभ हे दि.01.01.2026 पासुन फरकास लागु केले जातील .

पगार व पेन्शन मध्ये तब्बल 30-34 टक्के पर्यंत होईल वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शन मध्ये तब्बल 30-34 टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे . तर यामुळे शासनांच्या तिजोरीवर तब्बल 1.80 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 55% DA वाढ .

नविन वेतन आयोगातील ठळक वैशिष्ट्ये : नविन वेतन आयोगात किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 पट तर कमाल 2.67 पट प्रमाणे पगार वाढ करण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे .देय भत्ते हे बाजारमुल्यानुसार अदा होणार . दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतन / पेन्शनचा लाभ .

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे उत्कृष्ट कामाबद्दल वाढीव पगार , तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतन / बोनस देण्याची कर्मचारी युनियनची मागणी .

Leave a Comment