Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Terms/Conditions for Advance Allotment of House Construction to State Employees GR Issued on 18.07.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांस घरबांधणी अग्रीम वाटप करीता अटी / शर्ती बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय विधी व न्याय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार घरबांधणी अग्रीम वाटप करीता अटी / शर्ती नमुद करण्यात आलेले आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारास वितरीत करण्याच्या पुर्वी अर्जदाराने सर्व बाबींची तसेच कागदपत्रांची पुर्तता करण्यात आलेली आहे . व ते स्थायी असल्याची पुर्णपणे खात्री करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच बांधकाम करीता असणारी सदनिकेच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेण्यात आले आहेत , अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांच्या घराचे बांधकाम हे टप्यापर्यंत पुर्ण झाल्याची खातरजमा नियंत्रक अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच जमीन खरेदी करुन घर बांधणे या प्रयोजन करीता अग्रिमाकरीता अग्रिमाचा पहीला हप्ता मंजूर केल्याच्या नंतर दुसरा हप्ता मंजूर करण्याची शिफारस करण्यापुर्वी अर्जदाराच्या घराचे मंजूर आराखडे , स्थानिक प्राधिकरणाच्या मंजूरी आदेशाची प्रत व मुंबई वित्तीय नियम 1959 अंतर्गत नोंदणीकृत गहाण खताची प्रत नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिलेखात जतन करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तयार घर खदेरी : सदर प्रयोजन करीता प्रमाणित करण्यात आलेल्या अर्जदारांकडून मुंबई वित्तीय नियम 1959 अंतर्गत ए – 2 प्रपत्र भरुन करारनाम्यांची प्रत भरुन घेण्यात आल्यावरच अग्रिमाची रक्कम प्रत्यक्षात अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच घर खरेदीसाठी / घर बांधणीकरीता वित्तीय संस्था मार्फत घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड या प्रयोजन करीता अग्रीम प्रमाणित करण्यात आले आहेत . अशा अर्जदारांकडून अग्रिम मंजूरी पुर्वी त्यांच्या कर्ज व शिलकीबाबतचे संबंधित वित्तीय संस्था यांनी दिलेल्या अलीकडील प्रमाणपत्र घेवून त्यांच्याप्रमाणे शिल्लक कर्जाइतकेच अग्रिम मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे …
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025