Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 553 post Seva Pravesh rule change shasan nirnay ] : राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग कडून दिनांक 05 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे , याकरिता पदभरती प्रक्रिया अधिक एकसंघ, सुलभ, परिणामकारक व कालबद्ध करण्याकरिता सुधारित परीक्षा पद्धती संवर्गाचे तर्कसंगत व वर्गीकरण सेवाप्रवेश नियमाचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्याकरिता सेवा प्रवेश नियमांमधील शैक्षणिक पात्रता अनुभव प्राध्यान्य तसेच कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गांना सुधारणा लागू होणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहेत . या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू असणार आहे ( यामध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती पोलीस भरती बोर्ड द्वारे पोलीस भरती )
गट ब अराजपत्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहू शकता ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …
- आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..