Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Strict warning to government officers/employees ] : सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित देणेबाबत महसूल व वन विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी या कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ ( उदा . वाढदिवस ) साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आली आहे .
त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिक यांना त्याचे कामासाठी तिष्ठता रहावे लागते . अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणूक ) नियम 1979 नुसार उचित नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
त्यामुळे सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जमाबंदी आयुक्त व संचालक भुमि अभिलेख पुणे यांच्या कार्यालय तसेच अधिनस्त सर्व कार्यालयात यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळयास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे .
तसेच यापुढे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या अधिकारी / कर्मचारी यांना त्याचे नियंत्रण अधिकारी यांना तात्काळ समज देण्याचे व यापुढे अशा अनुचित बाबी घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा