राज्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळते प्रवास भत्ता ( TA ) जाणून घ्या सविस्तर ( सर्व ) शासन निर्णय !

Spread the love

@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ State employees get travel allowance (TA) even after retirement in this case. Know the detailed (all) government decisions. ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट प्रकरणी सेवानिवृत्तीच्या नंतर देखिल प्रवास भत्ता मिळतो . या संदर्भात राज्य सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेले सर्व शासन निर्णयाची उजळणी खालीलप्रमाणे पाहुयात .

01.सामान्य प्रशासन विभाग GR दि.20.06.2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी यांना सरकारीच्या वतीने न्यायालयीन त्याचबरोबर विभागीय चौकशीकरीच्या कामाकरीता करावा लागणाऱ्या प्रवास करीता दैनिक भत्ता , प्रवासभत्ता या शिवाय सवलतीच्या दरांमध्ये विश्रामगृह उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत .

02.तसेच राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या दि.18.04.1968 च्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर प्रवास भत्ता अदा करणेबाबत , तरतुदी नमुद करण्यात आलेल्या आहेत .

03.तसेच वित्त विभागाच्या दि.19.10.1962 रोजीच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास प्रवास भत्त्याची सवलतीची रक्कम संबंधितांच्या देणेकामी प्रवास भत्ताची तरतुद आहे .

याशिवाय वित्त विभागाच्या दि.28.10.1959 , दि.22.11.1961 रोजीच्या निर्णय देखिल निवृत्तीनंतर प्रवास , दैनिक भत्ता अदा करणेकामी महत्वपुर्ण आहेत .

Leave a Comment