Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Amendment in the transfer policy of officers/employees in Group B, C and D cadres ] : गट ब, क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे धोरण मध्ये सुधारणा करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.13.05.2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत .
पदस्थापनेचा पदावधी कालावधी : गट ब मधील राज्य शासनाचे अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी हा 03 वर्षाचा असणार आहे . परंतु गट क मधील कर्मचाऱ्यांकरिता त्याने धारण केलेल्या पदावर दोन पूर्ण पदावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर , तो त्या कार्यालयातून किंवा विभागातून दुसऱ्या कार्यालयात किंवा विभागात बदलीस पात्र ठरणार आहे .
इतर धोरणात्मक बाबी : प्रशासकीय किंवा विनंती बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांने अगोदर ज्या जागी सेवा केली असेल त्यामुळे जागेवर शक्यतो बदली देण्यात येऊ नये मात्र ही अट एकाकी पदास लागू राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
विवरणपत्र 03 मधील सुधारणा : प्राधान्यक्रम देत असताना 07. नंबर वर शासकीय कर्मचारी पुनर्नियुक्त माजी सैनिक यांना देण्याचे निर्देश . 08. क्रमांक वर 01 ते 07 मध्ये अंतर्भूत न होणारे अधिकारी कर्मचारी यांना प्राधान्यक्रम देण्याची निर्देश देण्यात आले आहेत.


- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..
- जनगणना व बीएलओ चे काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाती अर्जित रजेची नोंद करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.26.08.2026
- कार्यरत / निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.25.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )