Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ A major important decision by the government regarding state employees ] : राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे .
कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी , याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे . यांमध्ये दिनांक 25.04.2004 पुर्वी राज्य शासन सेवेत रुजु झालेले व विभागीय स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातुन पदोन्नती प्राप्त झालेल्या …
कर्मचाऱ्यांना त्याच्या प्रथम नियुक्ती दिनांक पासुनच पुढील पदोन्नतीकरीता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच पोलिस प्रशासनांतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखिल होणार आहे .
तसेच 27.05.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता ही सदर पदोन्नती पदाच्या तारखेपासून लागु करण्यात आलेली होती ,परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामधील गोंधळामुळे सदर निर्णयात बदल करण्यात आलेला आहे .
यांमध्ये प्रामुख्याने दिनाक 25.04.2004 पुर्वी अथवा त्याच्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता मध्ये संभ्रमता निर्णाण झालेली होती . तर आता दिनांक 25.04.2004 अथवा त्यापुर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय स्पर्धा परीक्षांने उत्तीर्ण होवून वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदावर पदोन्नती करीता ..
सेवाज्येष्ठता दिनांक ही 25.04.2004 अशी धरली जाईल , असे स्पष्ट करण्यात आले आहेत . तसेच दि.25.04.2004 नंतर रुजु झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्याना त्यांच्या प्रथम पदावर नियुक्ती तारीख हीच सेवाज्येष्ठतासाठी ग्राह्य धरली जाणार आहे .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026