ST महामंडळाच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास अंतर्गत चार व सात दिवस करीता , माफक दरांमध्ये पास सुविधा !

Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Bus Corporation offers 4 and 7 day pass facility at low rates under the Go Anywhere Travel Scheme. ] : एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या  योजना अंतर्गत चार व सात दिवस राज्यात तसेच आंतरराज्यासह माफक दरांमध्ये पास सुविधा उपलब्ध करुन दिले जाते .

गाडी प्रकार4 दिवस प्रवास मुल्य7 दिवस प्रवास मुल्य
साधी बस (आंतर राज्यासह )प्रौढांसाठी 1170/- रुपये मुलांसाठी – 585/- रुपयेप्रौढांसाठी 2040/- रुपये मुलांसाठी – 1025/- रुपये
शिवशाहीप्रौढांसाठी 1520/- रुपये मुलांसाठी – 765/- रुपयेप्रौढांसाठी 3030/- रुपये मुलांसाठी – 1520/- रुपये

प्रौढ / मुलांची व्याख्या : वरील तक्त्यात नमुद मुलांचे वय हे 05 वर्षापेक्षा जास्त तर 12 वर्षापेक्षा कमी असणाऱ्यांसाठी लागु असणार आहे . तर 12 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्यांना प्रौढ संबोधण्यात आले आहेत .

प्रमुख अट : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता 10 दिवस अगोदर पास काढणे आवश्यक असेल . अशा योजना अंतर्गत पासधारक आहेत म्हणून प्रवास नाकारु शकत नाही .

यांमध्ये आसनांची हमी दिली जाणार नसून आसनांसाठी स्वतंत्ररित्या आरक्षण भरुन आसन आरक्षित करता येईल . यांमध्ये प्रौढांना प्रवास दरम्यान 30 किलो तर मुलांस 15 किलो इतके समान विना – आकार प्रवास करता येतो .

सदर पास हा हस्तांतरणिय असणार नाही , तसेच हरविल्यास त्याचा कोणताही परतावा मिळू शकणार नाही . या योजना अंतर्गत आपणांस आवडेल तेथे प्रवास करु शकता .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *