महिला कर्मचाऱ्यांसाठी ( सरकारी / कंत्राटी / करार ) सुधारित करण्यात आलेले काही कायदे !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Some laws amended for women employees (government/contractual/agreement)! ] : महीला कर्मचाऱ्यांसाठी यांमध्ये सरकारी / कंत्राटी तसेच करार तत्वावरील कर्मचाऱ्यांकरीता सन 1961 नंतर सुधारित करण्यात आलेले काही कायदे पुढीलप्रमाणे पाहुयात .

सनकायदा
1994करार / कंत्राटी महिलांनाही प्रसुती रजा मंजूर.
1995दत्तक मुलांच्या संगोपन करीता 90 दिवसांची रजा मंजूर
2009राज्य महिला कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत बाल संगोपन करीता 180 दिवसाची रजा
2016सरोगसी महिला कर्मचारी व त्याच्या होणाऱ्या अपत्याच्या संगोपन करीता देखिल बालसंगोपन रजा
2017प्रसुती रजा 12 आठवडे वरुन 26 आठवडे

इतर कायदे : प्रसुतीच्या रजेसंदर्भात महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या रुजू होण्याच्या तारखाबाबत लेखी अथवा ई-मेलद्वारे माहिती देणे संबंधित कंपनींला बंधनकारक असेल .सदर 26 आठवड्यांच्या रजेचा पगार संबंधित महिलेला देणे बंधनकारक असेल .

तर कामाच्या स्वरुपानुसार संबंधित महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याची सुविधा . तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या ठिकाणी पाळणाघरची सुविधा असणे बंधनकारक असेल .

Leave a Comment