Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 14.08.2026 issued regarding the grant of the first benefit under the Revised Assured Career Progression Scheme (comprising three benefits) under the 7th Pay Commission. ] : सातवा वेतन आयोग अंतर्गत 03 लाभांचे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत माहिती व जनसंपर्क विभाग मार्फत दि.14.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाच्या दि.02.03.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10,20 व 30 वर्षाच्या नियमित सेवा नंतरची 03 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दि.01.01.2016 पासुन लागु करण्यात आलेली आहे . तसेच वित्त विभागाच्या दि.02.03.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवा नंतर पहिला , दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतुद आहे .
तसेच सामान्य प्रशासन विभगाच्या सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजना अंतर्गत त्यात नमुद करण्यात आलेल्या अटी / शर्तींची पुर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक ( माहिती ) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक ( माहिती ) / जनसंपर्क अधिकारी गट अ ( कनिष्ठ ) संवर्गातील ..
सोबत नमुद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना 03 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत पहिला लाभ मंजूर करण्यात येत आहे . तसेच परिशिष्ट अ मधील अधिकाऱ्यांना गट अ एस – 23 – 67700-208700/- ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहेत .
तसेच 03 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी व कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतनश्रेणीत त्यांना भविष्यात नियमित ( कार्यात्मक ) पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा : वेतननिश्चितीचा लाभ देय होणार नाही .


- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;