दि.17.08.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four highly significant Government Resolutions issued on 17.08.2026 regarding state officers and employees… ] : दि.17.08.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सन 2026-27 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहेत .

02.ग्राम विकास विभाग : राज्य सेवा परीक्षा 2024 नुसार शिफारस प्राप्त ठेरलेल्या गट विकास अधिकारी , गट अ मधील 49 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी व सहायक गट विकास अधिकारी , गट ब मधील 24 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी 02 वर्षांच्या कालावधीकरीता एकुण 73 अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

03.विधी व न्याय विभाग : किनवट जि.नांदेड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व सरकारी वकील कार्यालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.सामान्य प्रशासन विभाग – ( दि.14.08.2026 ) : बृहन्मुंबईबाहेर बदली झाल्यानंतर शासकीय निवास स्थानातील अनधिकृत वास्तव्यास आळा घालण्याकीरता करावयाची उपाय योजना करीता GR निर्गमित करण्यात आलेला आहे . ( शासन निर्णय दि.14.08.2026)

वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment