Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the necessary actions and measures to complete the e-KYC of teaching and non-teaching staff… ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत , प्रा.डॉ.श्रीकांत देशपांडे ( माजी विधान परिषद सदस्य / माजी राज्यमंत्राी दर्जा ) यांच्या मार्फत उपसंचालक शिक्षण अमरावती विभाग यांच्या प्रति पत्र सादर करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासनाने शिक्षण क्षेत्रातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करण्याबाबत , निर्देश दिलेले आहेत , सदर ई-केवायसी प्रक्रिया विहीत कालावधीत पुर्ण होणे आवश्यक आहे .
तथापि काही शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी विविध तांत्रिक तसेच प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे . त्यामुळे विभाग मार्फत संबंधित शिक्षणाधिकारी यांना आवश्यक सुचना निर्गमित करुन ई-केवायसी प्रक्रिया प्रभावीपणे व वेळेत पुर्ण करण्यासाठी योग्य त्या उपाययोाजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच ई-केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आधार , प्रमाणीकरण , मोबाईल क्र.अद्ययावत नसणे , माहितीमध्ये तफावत असणे इ.बाबींचे निराकरण करण्यासाठी संबंधित स्तरावर आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाही करण्याबाबत सुचना देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
तरी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी विहीत मुदतीमध्ये 100 टक्के पुर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सुचना निर्गमित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;