राज्य कर्मचाऱ्यांना ( सरकारी / निमसरकारी / महामंडळे ) नविन नियमावली लागु ; सा.प्र.वि मार्फत GR निर्गमित दि.28.07.2025

Spread the love

 Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ New rules applicable to state employees (government/semi-government/corporations) gr ] : राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना नविन नियमावली लागु करणेबाबत , राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 28 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांमध्ये प्रतिनियुक्तीने कार्यरत असणारे तसेच करार पद्धतीने , बाह्यस्त्रोत द्वारे , नियुक्त सर्वांना तसेच राज्यातील महामंडळे , मंडळे , व सार्वजनिक उपक्रम यामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना यापुढे पुढील नियमावली लागु असणार आहे .

नियमावली : सरकार मार्फत प्राधिकृत करण्यात आलेले योजना / उपक्रम यांच्या यशस्विततेच्या अनुषंगाने राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मिडीयावर मजकुर लिहीता येणार आहे , परंतु त्यामुळे स्वयंप्रशंसा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

  • सोशल मिडीयाचा वापर हे अत्यंत जाणीवपुर्वक व जबाबदारीने करण्याचे निर्देश .
  • सरकारच्या चालु अथवा अलिकडच्या धोरणांवर अथवा कृतीवर प्रतिकूल टीका न करण्याचे निर्देश .
  • सरकारने ( केंद्र / राज्य ) बंदी घातलेले ॲप , वेबसाईट इ.चा वापर न करण्याचे निर्देश .
  • सरकारी योजना / उपक्रम इ. प्रसार व प्रचार करण्यासाठी केवळ सरकारी अधिकृत माध्यमांचाच वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
  • तसेच कार्यालय अंतर्गत समन्वय साधण्यासाठी टेलिग्राम , व्हॉट्सॲप इ. सोशल मिडीयाचा वापर करता येणार आहे .
  • अधिकारी यांनी केलेले वैशिष्ट्यपुर्ण कामाबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करता येईल , परंतु त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नसल्याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
  • वैयक्तिक सोशल मिडीया खात्यावर केवळ आपले वैयक्तिक प्रोफाईल फोटो वगळता सदर खात्यांमध्ये पदनाम ,लोगो , वर्दी , गणवेष त्याचबरोबर शासकीय मालमत्ता जसे वाहन , इमारत इ. वापर फोटो / रिल्स / व्हिडीओ अपलोड करणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी तक्ता ; जाणून घ्या सविस्तर .

तसेच द्वेषमुलक , आक्षेपार्ह त्याचबरोबर भेदभाव , मानहानीकारक उत्पन्न होणारे मजकुर फॉरवर्ड / शेअर / अपलोड न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

  • तसेच प्राधिकृत करण्यात आलेल्या अथवा पुर्व मंजूरीशिवाय कोणत्याही प्रकारचे शासकीय दस्ताऐवज शेअर / अपलोड / फॉरवर्ड न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
  • बदली झाल्याच्या नंतर सरकारी सोशल मिडीया खाते काळजीपुर्वक योग्य प्रकारे हस्तांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .सदर नमुद नियमांचे भंग झाल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार , कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
  • सदर नमुद नियमांचे भंग झाल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार , कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment