शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक पदावरील नियुक्ती संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.25.03.2026

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding appointment from non-teaching post to teaching post issued on 25.03.2026 ] : शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक पदावरील नियुक्ती संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 25.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी अथवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली व जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत …

कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन व इतर सर्व अटी / शर्ती लागु असणार आहेत ..

मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पुर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतन करीता ग्राह्य धरता येईल अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .तसेच शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक / शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही…

 शासन आदेशात / परिपत्रकात तसेच संलेखात असलेल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तरतुदी देखिल त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत .

Leave a Comment