पदोन्नती ( Pramotion ) नाकारल्यानंतर उद्भवणारे प्रमुख परिणाम ; महत्वपुर्ण GR

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Major Consequences Arising from Declining a Promotion ] : पदोन्नती नाकारल्याच्या नंतर उद्भवणारे प्रमुख परिणाम संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.12.09.2016 रोजी सामान्य प्रशासन विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

प्रथत : पदोन्नतीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर जर कर्मचाऱ्यांने पदोन्नती करीता नकार दिल्यास , पुढील दोन वर्षे त्याचे सदर यादीमध्ये विचार केला जाणार नाही . तर तीसऱ्या वर्षी पदोन्नती यादींमध्ये विचार केला जाईल . असेच चक्र पुढे सुरु राहील .

जर कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती जर नाकारली जर सदर कर्मचाऱ्यांचे पुढील कोणत्याही निवडसुचीकरीता विचार केला जाणार नाही . तसेच ज्याची निवडसुचीमध्ये निवड होवून देखिल पदोन्नती न स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवडसुची व त्यानंतर निवडसुची मानिव दिनांक प्राप्त होणार नाही .

आर्थिक लाभ : जर एखाद्या कर्मचाऱ्यांने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतला असेल , व सदर कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारली असेल , अशा प्रकरणी सदर लाभ काढून घेणे संदर्भात वित्त विभाग मार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर पदोन्नती न स्विकारल्याने , सदर जागी सदर कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांचा निवडसुचीमध्ये समावेश करण्याचे निर्देश आहेत .

Leave a Comment