Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ maharashtra bandh news ] : उद्या दिनांक 14 जुलै वार सोमवार रोजी राज्यातील इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन्स ( AHAR ) संघटनामार्फत महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे .
महाराष्ट्र बंदचे नेमके कारण काय ? : सरकारकडून हॉटेल तसेच रेस्टॉरंट उद्योगावर लादलेल्या मोठ्या प्रमाणातील करवाढीच्या विरोधात सदर महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आलेली आहे . सदर घोषणा संघटनेमार्फत अधिकृत पोस्टद्वारे करण्यात आलेली आहे .
करवाढ : राज्य सरकारकडून मद्यावर VAT कर शुल्क दुप्पटीने वाढ केला आहे , तर परवाना शुल्क मध्ये चक्क 15 टक्के वाढ केली गेली आहे , याशिवाय उत्पादन शुल्क चक्क 60 टक्क्यांनी वाढवले आहेत , त्याचा थेट परिणाम ग्राहकावर तसेच उद्योजकांवर होणार आहे .
या करवाढीच्या विरोधात सदर असोसिएशन मार्फत सोमवार दिनांक 14 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे . या करवाढीमुळे विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच काहींच्या नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात , असा धोका निर्माण होण्याची शक्यता असोसिएशन मार्फत वर्तवण्यात आली आहे .
उद्या काय काय बंद राहील ? : दिनांक 14 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे , यामध्ये राज्यातील सर्व परमिट रूम , बार बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशन मार्फत घेण्यात आला आहे .