Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta vadh Shasan Nirnay dated 11 may] : महागाई भत्ता (DA) 60 टक्के दराने लागू करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या दिनांक 22 एप्रिल 2026 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करिता अग्रेषित करण्यात आलेली आहे .
यानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेला दोन टक्के (2%) वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना ….
लागू राहतील , यानुसार दिनांक 01 जानेवारी 2026 पासून 60 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येत आहे. यानुसार थकबाकीची रक्कम देखील अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा
- समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याचे निर्देश
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक घडामोडी
- 📊 महाराष्ट्र राज्य शासन — शिक्षकांची ७वा वेतन आयोग वेतनश्रेणी (नियमित , वरिष्ठ, निवड)