@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Local Holidays 2026 Government Gazette issued on 26.11.2025 ] : स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत राज्य सरकार मार्फत दिनांक 26.11.2025 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित करण्यात आले आहेत .
अधिनियम 1881 च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसुचना दि.08.05.1968 नुसार महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन , महाराष्ट्र शासन याद्वारे राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ..
मंगळवार दि.02.12.2025 रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ( नगर पंचायती / नगर परिषदा ) संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

यानुसार मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते कि , त्यांनी सदरची अधिसुचना त्यांच्या सरकारी / निमसरकारी कार्यालये , मंडळे / महामंडळे यांच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यानुसार उपरोक्त नमुद नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांना देखिल स्थानिक सुट्टी असणार आहे .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026