Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Investigation into irregular selection of teaching/non-teaching staff in Nagpur, Nashik, Jalgaon, Beed, Latur, Mumbai ] : राज्याती अपात्र शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियम बाह्य रित्या समाविष्ट करुन वेतन अदा केल्या संदर्भातील विशेष चौकशी पथक मार्फत चौकशी करणेबाबत , शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 07.08.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील अपात्र शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य रित्या समाविष्ट करुन वेतन अदा केले संदर्भात विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येत आहे .
यांमध्ये श्री.चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त , पुणे पथक प्रमुख अंतर्गत मनोज शर्मा पोलिस महानिरीक्षक , कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य सदस्य व श्री.हारुन आतार सह संचालक शिक्षण आयुक्तालय सदस्य सचिव अशा त्रिस्तरीय पथकाची निवड करण्यात आलेली आहे .
सदर विशेष पथकाची कार्यकक्षा : राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत अनुदानित व अंशत : अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता / शालार्थ मान्यता / सेवासातत्य / विना अनुदानित वरुन अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनांस सादर करणे .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 5180+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदा. वैयक्तिक मान्यता / शालार्थ मान्यता इ.अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने कराव्याच्या बदलाबाबत , सुधारणा सुचिविण्याचे निर्देश आहेत .
तसेच विशेष चौकशी पथकाने सदर कार्यकक्षेमधील नमुद प्रकरणी सन 2012 ते आजतागायत प्रकरणांची चौकशी / तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठित झाल्याच्या दिनांकापासुन तीन महिन्यांच्या आत शासनांस सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025