Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [Important GR regarding increasing the maximum limit of retirement gratuity/death gratuity to Zilla Parishad, aided teachers/non-teaching employees ] : जिल्हा परिषद , अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा वाढविणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.11.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकार प्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर वित्त विभागाच्या दि.10.10.2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 01.09.2024 पासुन ..
सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख वरुन 20 लाख रुपये अशी वाढविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहेत . यांमध्ये वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागु राणार आहेत .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश