@marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important GR issued by Finance Department regarding State Employees on 18.12.2025 ] : राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
वित्त विभागाच्या सदर निर्णयानुसार अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आले आहे . यांमध्ये सरकारी निवास स्थान संदर्भात शिल्लक लायसन्स फीच्या वसुली संबंधातील माहिती कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत ठराविक तारखेपुर्वी न मिळाल्यास , सरकारी निवासस्थान मिळालेल्या ..
सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या निवृत्तीपुर्वीच्या 08 महिन्यांच्या कालावधीबाबत वसुली योग्य कोणतीही लायसन्स फी येणे नाही असे गृहीत धरण्यात येईल . अशी तरतुद असल्याने , या माहितीची प्रतिक्षा न करता सेवानिवृत्ती प्रकरण पाठविणे शक्य असल्याने याची कार्यालय प्रमुखांनी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
जर निवृत्तीनंतरही सरकारी निवासस्थानाचा ताबा हा जर कर्मचाऱ्याकडे असल्यास त्या बाबत वित्त विभागाच्या दि.16.02.2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच निवास स्थान संबंधित असणारे येणे रकमांच्या व्यतिरिक्त इतर रकमांपैकी घरबांधणी अग्रिम अथवा वाहन अग्रिम यांची वसुली वेतनातुन होत , असल्याने त्या बाबत आदेशाची नोंद सेवापुस्तकात असल्याने त्याची माहिती ही विभाग प्रमुख यांच्यामार्फत माहिती उपलब्ध होऊ शकेल . त्यांच्यामार्फत सदर माहिती उपलब्ध करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
निवृत्तीवेतनाची कार्यपद्धती करण्याकरीता विहीत केलेल्या कार्यपद्धतीचे व वेळापत्रकाचे प्रत्यक्ष पालन होत आहे , याची दक्षता घेण्याचे तसेच निवृत्तीवेतनाचे कागदपत्रे विहीत नमुन्यात सर्व बाबतीत यथोचितरित्या पुर्ण करुन सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 06 महिने अगोदर महालेखापाल यांच्या कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026